Sangli: कोळगिरीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 01:17 PM2023-08-28T13:17:55+5:302023-08-28T13:18:21+5:30

शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी नाही परतला

Suspicious death of young man from Kolgiri in Jat taluka sangli | Sangli: कोळगिरीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय 

Sangli: कोळगिरीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय 

googlenewsNext

उमदी : जत तालुक्यातील कोळगिरी येथील शिवाजी बिराप्पा डिस्कळ (वय ३३) याचा मृतदेह अंकलगी (ता. जत) येथील मल्लाप्पा तेली यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला आहे. उमदी पोलिसात याबाबत नोंद झाली आहे. नातेवाइकांनी शिवाजी याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी डिस्कळ हा शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला होता. तो कुणाच्या तरी दुचाकीवरून जाताना नागरिकांनी बघितले होते. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईल लागला नाही. घरच्या लोकांनी रात्रभर त्याची चौकशी केली. त्यानंतर रविवारी त्याचा शोध सुरू असताना दुपारी त्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याची बातमी गावात पसरली.

उमदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत शिवाजी याच्या डोक्याला डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली आहे. तसेच विहिरीत केवळ गुडघाभर पाणी होते. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नसून खून करण्यात आला असावा, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. उमदी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

शिवाजी याला मारहाण करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. रात्री उशिरा याप्रकरणी गुड्डापूर येथील एका संशयितास उमदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती होती. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. याबाबत पोलिस नाईक बन्नेनावर तपास करीत आहेत.

Web Title: Suspicious death of young man from Kolgiri in Jat taluka sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.