मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:10 PM2018-10-24T13:10:42+5:302018-10-24T15:40:21+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगली जिलह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले.

Swabhimani Shetkari Sanghatana activists look after the Chief Minister's tour | मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नजरकैदेत

मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नजरकैदेत

Next
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नजरकैदेतही दडपशाही येणाऱ्या काळात उधळून लावू : महावीर पाटील

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगली जिलह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले.

या प्रकाराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागील दौऱ्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले होते. त्यामुळे या घटनेची पुनुरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी मंगळवारीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावीर पाटील व अन्य कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवले.

मुख्यमंत्री सांगलीतून जाईपर्यंत ही नजरकैद कायम होती. आज मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून काल रात्री पासून मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे. सरकारची ही दडपशाही येणाऱ्या काळात उधळून लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी दिला.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana activists look after the Chief Minister's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.