‘स्वाभिमानी’ची आज कडकनाथ संघर्ष यात्रा निघणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:05+5:302020-12-27T04:20:05+5:30

खराडे म्हणाले की, केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हा कायदा वाचून घेण्याची गरज ...

Swabhimani's Kadaknath Sangharsh Yatra will start today | ‘स्वाभिमानी’ची आज कडकनाथ संघर्ष यात्रा निघणारच

‘स्वाभिमानी’ची आज कडकनाथ संघर्ष यात्रा निघणारच

Next

खराडे म्हणाले की, केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हा कायदा वाचून घेण्याची गरज आहे. कायद्यात कॉन्ट्रॅक्ट फर्मिंगचे ही एक विधेयक आहे. कडकनाथ कुक्कटपालन हेही कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग होते. या कडकनाथ घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला की तोटा झाला हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌ध्वस्त झाले. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असताना कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग फायद्याचे आहे हे कोणत्या तोंडाने सदाभाऊ शेतकऱ्यांना सांगणार हा आमचा सवाल आहे. कडकनाथ घोटाळ्यातील लोकांना तुम्ही कधी न्याय देणार आहे. याचा जाब विचारण्यासाठीच शेकडो शेतकऱ्यांसह आज, रविवारी दि. २७ रोजी कडकनाथ यात्रेची सांगलीतील स्टेशन चौकातून सुरुवात होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या सोडून निषेध करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Swabhimani's Kadaknath Sangharsh Yatra will start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.