तासगावमध्ये ‘स्वाभिमानी’चे मुंडण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:35+5:302021-07-23T04:17:35+5:30
लोकमत न्यूज नेअवर्क तासगाव : तासगाव व नागेवाडी कारखान्याकडील थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्क ...
लोकमत न्यूज नेअवर्क
तासगाव : तासगाव व नागेवाडी कारखान्याकडील थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर गुरुवारी मुंडण व शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. मंगळवारपासून हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. यामध्ये उषाताई जगताप या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेसह ५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गुरुवारच्या आंदोलनात उषाताई जगताप यांनीही मुंडण करून बिल न देणाऱ्यांना केस दान करत असल्याचे सांगितले.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले की, महिलेसह ५० शेतकऱ्यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत ठोस पर्याय होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
यावेळी दुर्योधन घाडगे, उषाताई जगताप, जालिंदर जाधव, नागेश खामकर, महादेव पवार, शाम पवार, समीर तांबोळी, सत्यवान माने, हणमंत चव्हाण, गोरख जाधव, अशोक जाधव यांच्यासह ५० शेतकऱ्यांनी मुंडण केले.