बदली कामगारांचा आत्महत्येचा इशारा - कायम करण्याची मागणी-सांगली महापालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:19 PM2018-10-02T12:19:43+5:302018-10-02T12:23:34+5:30
गेल्या तीस वर्षांपासून बदली कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना कायम करा, अन्यथा महापालिकेसमोर आत्महत्या करू, असा इशारा या कर्मचाºयांनी सत्ताधारी पदाधिकाºयांना दिला.
सांगली : गेल्या तीस वर्षांपासून बदली कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना कायम करा, अन्यथा महापालिकेसमोर आत्महत्या करू, असा इशारा या कर्मचाºयांनी सत्ताधारी पदाधिकाºयांना दिला. यावेळी स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, नगरसेवक शेखर इनामदार यांनी, या आठवड्यात अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेऊन बदली कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय दिला जाईल अशी ग्वाही दिली. कायम करण्यासाठी काही संघटनांनी दोन हजार रुपये घेतल्याचीही तक्रार यावेळी काही बदली कर्मचाºयांनी केली.
महापालिकेत कायम कर्मचारी रजेवर असताना त्याच्याजागी ५०० हून अधिक बदली कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. या बदली कर्मचाºयांना कायमस्वरूपी काम दिले जात नाही. महिन्याभरात चार ते पाच दिवसच काम मिळते. त्यांना कायमस्वरुपी आस्थापनेवर नियुक्त करण्याचा प्रश्नही प्रलंबित आहे.
त्यासाठी सोमवारी बदली कर्मचारी मोठ्या संख्येने महापालिकेत आले. पालिकेच्या पदाधिकाºयांच्या कार्यालयाबाहेरच त्यांनी ठाण मांडले. पदाधिकाºयांची भेट घेऊन, आमचा विचार करा, अशी मागणी त्यांनी केली.
बदली कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुनील मोहिते, सुनंदा वारे यांच्यासह कर्मचाºयांनी स्थायी समितीचे नूतन सभापती अजिंक्य पाटील, नगरसेवक शेखर इनामदार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी संतप्त बदली कर्मचाºयांनी, आमच्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, अशी मागणी केली. काही कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक कर्मचारी बदली म्हणूनच निवृत्त झालेत. जे आहेत त्यांना कायम सेवेत घ्यावे, अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल, असा इशारा दिला. यावर सभापती पाटील, शेखर इनामदार यांनी येत्या आठवड्यात पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक होईल, यात निश्चित असा मार्ग काढू, अशी ग्वाही अजिंक्य पाटील यांनी दिली.