सफाई कामगारांना किमान मजुरी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:58+5:302021-05-11T04:27:58+5:30

भिवघाट-करंजे मार्गाची दुर्दशा सांगली : भिवघाट ते तासगाव या मार्गावर भिवघाट ते करंजेपर्यंत काम अर्धवट असल्यामुळे मोठे खड्डे पडले ...

Sweepers should be paid a minimum wage | सफाई कामगारांना किमान मजुरी द्यावी

सफाई कामगारांना किमान मजुरी द्यावी

Next

भिवघाट-करंजे मार्गाची दुर्दशा

सांगली : भिवघाट ते तासगाव या मार्गावर भिवघाट ते करंजेपर्यंत काम अर्धवट असल्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत. सध्या ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाल्याने यामार्गे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांची आहे.

उपनगरात घाणीचे साम्राज्य

सांगली : महापालिका क्षेत्रातील उपनगरात अनेक ठिकाणी गटारीचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा

सांगली : राज्यात शासनाच्यावतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते; मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेपासून वंचित आहेत.

Web Title: Sweepers should be paid a minimum wage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.