कवठेमहांकाळमधील एकाचा स्वाइन फ्लूने सांगलीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:02 PM2018-10-12T16:02:32+5:302018-10-12T16:04:32+5:30
कवठेमहांकाळ येथील राजकुमार रामचंद्र पवार (वय ४५) यांचा गुरुवारी रात्री उशिरा ह्यस्वाइन फ्लूह्णने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. कवठेमहांकाळ तालुक्यात स्वाइन फ्लूचा हा दुसरा बळी आहे. आरोग्य विभागाने तातडीने परिसरात घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे.
सांगली : कवठेमहांकाळ येथील राजकुमार रामचंद्र पवार (वय ४५) यांचा गुरुवारी रात्री उशिरा ह्यस्वाइन फ्लूह्णने मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. कवठेमहांकाळ तालुक्यात स्वाइन फ्लूचा हा दुसरा बळी आहे. आरोग्य विभागाने तातडीने परिसरात घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे.
पंधरा दिवसापासून राजकुमार पवार हे ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास सुरु होते. त्यांनी औषधोपचार घेतले. पण प्रकृतीत बिघडतच गेली.
आठवड्यापूर्वी त्यांना कवठेमहांकाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असेल, असा डॉक्टरांना संशय आला.
चार दिवसापूर्वी त्यांच्या रक्त व थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यामध्ये त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल होते.