स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही : विजयसिंहराजे पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:56 PM2019-11-27T23:56:05+5:302019-11-27T23:56:30+5:30

सांगली : येथील पटवर्धन राजघराण्यातील कोणाचाही स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही. संबंधित प्रकरणात आयकर विभागाला खुलासा दिला असून, ...

Swiss Bank has nothing to do with black money: Vijay Singhraj Patwardhan | स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही : विजयसिंहराजे पटवर्धन

स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही : विजयसिंहराजे पटवर्धन

Next

सांगली : येथील पटवर्धन राजघराण्यातील कोणाचाही स्वीस बँकेतील काळ्या पैशाशी संबंध नाही. संबंधित प्रकरणात आयकर विभागाला खुलासा दिला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्टसुद्धा आहे, अशी माहिती विजयसिंहराजे पटवर्धन यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सांगलीच्या पटवर्धन परिवाराचा स्वीस बँकेलील काळ्या पैशाशी काहीही संबंध नाही. १९९१ ते २००४ पर्यंत आखाती देशात काम करीत असताना मिळविलेली कमाई कन्या मधुवंतीच्या नावे बक्षीसपत्र करून दिलेली आहे. भारतीय आयकर विभागाला याबाबत खुलासा दिला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आमच्या नावाने परदेशी बँकेत कोणतीही खाती नाहीत.
१९९१ पासून अनेक वर्षे आखाती देशात मी काम करीत होतो. २00४ मध्ये कायमस्वरुपी भारतात परतलो. दरम्यान, आखाती देशात काम करताना मिळविलेली रक्कम, बचत आणि कामाबद्दलची येणेबाकी यासह सर्वांचे बक्षीसपत्र माझी कन्या मधुवंतीच्या नावाने केले आहे. ती सध्या अनिवासी भारतीय असून अमेरिकेतील शिकागो येथे वास्तव्यास आहे. काही वर्षांपूर्वी तिला आर्थिक संकटाचा सामना करवा लागला. परदेशात असताना आपल्या मुलीला आर्थिक अडचण भासू नये यासाठी आई-वडील म्हणून आम्ही तिच्या नावे बक्षीसपत्र करून दिले आहे. मधुवंतीला दिलेल्या बक्षीसपत्रातील सर्व गोष्टींबाबत तिने अमेरिकेतील आयकर विभागाच्या विवरणपत्रात तपशील दिला आहे. त्याचबरोबर आम्हीही भारतीय आयकर विभागाकडे तसा खुलासा केला आहे. त्यासोबत आम्ही आमचे अ‍ॅफिडेव्हीट आणि आम्हाला त्यावेळेस ज्यांनी मदत केली, त्या सर्वांची अ‍ॅफिडेव्हीट व संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे.
सध्या परदेशात कोणतेही खाते नाही
पटवर्धन यांनी म्हटले आहे की, आता आमच्या नावाने परदेशात कोठेही कोणतीही खाती नाहीत आणि कोणताही काळा पैसा, धनही नाही. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. भारतीय आयकर विभागाने आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. परदेशातील पैशाचे वृत्त खोटे आहे.

Web Title: Swiss Bank has nothing to do with black money: Vijay Singhraj Patwardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.