बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत सोमवारी सांगलीत लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:22 AM2021-01-04T04:22:57+5:302021-01-04T04:22:57+5:30

आष्टा : भारतीय मजदूर संघाच्या संलग्न सांगली जिल्हा बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सोमवार (दि. ४) ...

A symbolic hunger strike in Sangli on Monday over the demands of construction workers | बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत सोमवारी सांगलीत लाक्षणिक उपोषण

बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत सोमवारी सांगलीत लाक्षणिक उपोषण

Next

आष्टा : भारतीय मजदूर संघाच्या संलग्न सांगली जिल्हा बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सोमवार (दि. ४) बांधकाम कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अनुप वाडेकर यांनी दिली.

अनुप वाडेकर म्हणाले, सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना कामगारांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आलेले आहे. मात्र, फक्त आश्वासन दिले जात आहे. परंतु न्याय मिळत नाही. कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानांतर्गत करण्यात आलेली नोंदणीची तपासणी करून कामगारांची पुस्तके ऑफलाईन पद्धतीने द्यावीत.

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांची शिष्यवृत्तीचे अर्ज निकालात काढण्यात यावेत तसेच औजारे खरेदी साहित्यासाठी ५ हजार रुपयाचे प्रलंबित अर्ज मार्गी लावावेत. मंडळाचे सर्व काम कामगार सुविधा केंद्रांमधून करण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व कामगार बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनुप वाडेकर यांनी केले आहे.

Web Title: A symbolic hunger strike in Sangli on Monday over the demands of construction workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.