डेंग्यू आणि कोरोनाची लक्षणे एकसारखीच, त्वरित चाचणी हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:39+5:302021-07-23T04:17:39+5:30

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या लाटेत आता डेंग्यूचीही भर पडली आहे. पावसाळ्यामुळे डेंग्यूचे रुग्ण मोठ्या ...

The symptoms of dengue and corona are the same, quick testing is the only option | डेंग्यू आणि कोरोनाची लक्षणे एकसारखीच, त्वरित चाचणी हाच पर्याय

डेंग्यू आणि कोरोनाची लक्षणे एकसारखीच, त्वरित चाचणी हाच पर्याय

Next

संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या लाटेत आता डेंग्यूचीही भर पडली आहे. पावसाळ्यामुळे डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे एकसारखीच असल्याने सामान्य नागरिक संभ्रमात आणि भीतीच्या छायेत आहेत. या दोन्ही आजारांत सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास होतो, त्यामुळे चाचणी कशाची करायची, असा प्रश्न पडतो. अर्थात, या दोहोंमध्ये किंचित फरक आहे. अंतिम निदान चाचणीनंतरच होते. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास अंगावर काढू नका, डॉक्टरांना भेटा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

डेंग्यूचे रुग्ण

२०१९ - ७३१, २०२० - ११५, २०२१ (जुलैपर्यंत) - १६

चाचणी कुठली?

कोरोनासाठी - स्वॅब चाचणी

डेंग्यूसाठी - रक्त चाचणी

बॉक्स

डेंग्यू, कोरोना एकसारखेच

- डेंग्यू आणि कोरोनाची बहुतांश लक्षणे एकसारखीच असल्याने रुग्ण संभ्रमात व भीतीखाली जातो.

- खोकला, ताप, सर्दी, कणकण, अंगदुखी, घसादुखी ही काही दोहोंतील सामान्य लक्षणे आहेत.

- कोरोनामध्ये सर्दी आणि खोकल्याची तीव्रता थोडी जास्त असू शकते.

- कोरोनामध्ये क्वचित श्वासोच्छ्‌वासाला त्रास होतो. अंगदुखी प्रमाणापेक्षा जास्त असते.

बॉक्स

पाणी उकळून प्या, डासांपासून बचाव करा

- पावसाळ्यात घराभोवती पाण्याचे साठे होऊ नयेत, याची काळजी घ्यावी.

- फ्रीज, कूलर तसेच निरुपयोगी भांडी, खराब टायर यातील पाणी फेकून द्या.

- पाणीसाठे नियमित कोरडे करा, उकळलेले पाणी प्या, डासांचा फैलाव रोखा.

कोट

अंगावर काढू नका

तुम्हाला कोरोना झाला आहे की डेंग्यू, याचा निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या. कसलाही ताप, थंडी किंवा सर्दी अंगावर काढू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. निदान वेळेत झाले, तर उपचारही वेळेत मिळतील.

- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल रुग्णालय

Web Title: The symptoms of dengue and corona are the same, quick testing is the only option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.