रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या मास्टर माईंडवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:54+5:302021-04-26T04:24:54+5:30
सांगलीत रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. मिरज सिव्हील हॉस्पिटलमधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर व खासगी ...
सांगलीत रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. मिरज सिव्हील हॉस्पिटलमधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर व खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ टेक्निशियन दाविद वाघमारे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या संशयितांकडे एक इंजेक्शन सापडले व यापूर्वी दोन इंजेक्शनची त्यांनी बाहेर विक्री केली आहे. आरोपी मिरज शासकीय रुग्णालयातील मृत रुग्णांची शिल्लक राहिलेली इंजेक्शन बाहेर विकत होते. आता रुग्णांची इंजेक्शन विकून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडत असून, सिव्हिल हॉस्पिटलच्या सिव्हिल प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता याची सखोल चौकशी करावी. त्यांच्यावर कारवाई करावी, पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सूत्रधार व आणखी कितीजण या प्रकरणात आहेत, हे शोधून काढावे, अशीही मागणी डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली.