उपसा बंदीतही उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Published: April 25, 2016 11:34 PM2016-04-25T23:34:26+5:302016-04-26T00:27:03+5:30

शिवाजीराव नाईक : शिराळ्यात ऊर्जा मित्र बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; पैसे घेणाऱ्या लाईनमनची बदली करा

Take action against the taxpayers, but prohibit the taxpayers | उपसा बंदीतही उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा

उपसा बंदीतही उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा

Next

शिराळा : थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आमिषाच्या जोरावर मदत करणाऱ्या लाईनमनवर कारवाई करावी, तसेच ऊर्जा मित्र बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अ‍ॅक्युरेट इलेक्ट्रीकल कंपनीला नोटीस काढावी, असे आदेश आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिले. येथे झालेल्या ऊर्जा मित्र बैठकीत ते बोलत होते.
आमदार नाईक म्हणाले, सध्या कधी नव्हे ती पाणीटंचाई शिराळा तालुक्यात आहे. वीज वितरण कंपनीकडून थकित रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांना कारवाईची भीती दाखवून आर्थिक आमिषाच्या जोरावर त्यांना बंदी असतानाही पाणी उपसा करुन देत आहेत. अशा शेतकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या लाईनमनची ताबडतोब बदली करुन कारवाई करावी. शिराळा व वाळवा तालुक्यातील अनेक कामांचे ठेके अ‍ॅक्युरेट इलेक्ट्रीकल कंपनीने घेतले आहेत. मात्र त्यांच्याकडून वेळेत काम होत नाही. त्याचबरोबर त्यांचा एकही कर्मचारी कोणत्याही ऊर्जा मित्र बैठकीस उपस्थित राहिलेला नाही. त्यांना वीज वितरण कंपनीने नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करावी.
आमदार नाईक म्हणाले, येळापूर परिसरातील लोकांची सिंगल फेजची मागणी मोठी आहे. त्यामुळे येथील कामे तात्काळ करावीत. निगडी येथील बाळकू साळुंखे यांचे १९९८ पासून मंजुरीसाठी थांबलेले घरगुती कनेक्शन ताबडतोब द्यावे. वाडीभागाई व मेणी येथील जळीतग्रस्तांना एका महिन्यात भरपाई द्यावी. बिळाशी सब स्टेशनसाठी जमीन दिलेल्या मालकांना लवकर भरपाई द्यावी. जादा आकारणी झालेल्या बिलाचा परतावा द्यावा. थकितांना सोयीचे हप्ते पाडून द्यावेत आणि शेती पंपांना लवकरात लवकर मीटर बसविण्याची कार्यवाही सुरु ठेवावी, अशा त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यामध्ये दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
यावेळी मागील बैठकीतील ३७ प्रकरणे मार्गी लागल्याचे सांगून, या बैठकीतील आलेल्या ३६ अर्जांवर चर्चा करुन ती पुढील कार्यवाहीसाठी वितरण विभागाकडे देण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, माजी उपसभापती विजय कांबळे, संजय बेंगडे, आबा सुतार, विजय शिरसठ, कार्यकारी अभियंता यु. एस. शेख, उपकार्यकारी अभियंता सपाटे, सु. वा. कोकणे, कनिष्ठ अभियंता च. बि. जाधव, शि. वा. देशमाने, एस. एस. गुंजले, शा. का. पेठ, आर. वाय. माने, वाय. व्ही. मालवणकर, डी. एस. काठाळे, सी. आर. बेंद्रे, एस. एस. गायकवाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Take action against the taxpayers, but prohibit the taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.