सायकल घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:44 PM2017-08-28T23:44:20+5:302017-08-28T23:44:20+5:30

Take action against those involved in the cycle fraud case | सायकल घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी

सायकल घोटाळ्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून तासगाव पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात आलेल्या सायकल खरेदीचा व्यवहार संशयास्पद असून, एका साखळीमार्फत झालेला हा अपहार आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी असणाºया सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे पक्षप्रतोद सत्यजित देशमुख यांनी सोमवारी स्थायी समिती सभेत केली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समिती सभा पार पडली. महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींना सायकलींसाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आली होती. शासनाच्या नव्या धोरणानुसार लाभार्थ्यांना वस्तूचे वाटप न करता, त्याऐवजी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय आहे. मात्र हा निर्णय बासनात गुंडाळून तासगाव पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल वाटप करण्याचा कारनामा चव्हाट्यावर आला आहे. यात टक्केवारीचाही झोल झाला आहे.
हा मुद्दा उपस्थित करताना सत्यजित देशमुख म्हणाले की, सायकल खरेदीचा साराच प्रकार संशयास्पद आहे. नवेखेडमधील एका सायकल मार्टमधून ७४ सायकली खरेदी केल्याचे दाखविण्यात आले. वास्तविक या दुकानाची संबंधित ग्रामपंचायतीकडे नोंदच नाही. व्हॅट किंवा अन्य कराचा भरणा केलेले हे अधिकृत दुकान नाही. स्थानिक बाजारपेठेला वाव देण्याचे धोरण असताना, तासगावात खरेदी न करता ती नवेखेडमध्ये कशी झाली? लाभार्थ्यांना तासगाव आणि सांगली हा जवळचा पर्याय होता. या गोष्टी तर्कसंगत नाहीत. हा प्रकार घडत असताना महिला व बालकल्याण विभागाच्या जबाबदार अधिकाºयांच्या लक्षात ही बाब का आली नाही? यातील १३ लाभार्थ्यांचे पैसे जिल्हा बँकेच्या सांगलीच्या मार्केट यार्ड शाखेतील एकाच खात्यावर कसे जमा झाले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अपहार किती रकमेचा आहे यापेक्षा, ही मानसिकताच मुळापासून नष्ट करण्याची आवश्यकता आहे, असे देशमुख म्हणाले.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, या प्रकरणाचा अहवाल प्राप्त होताच तातडीने कारवाई करण्यात येईल.
या सभेला उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती प्रा. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रम्हानंद पडळकर, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने आदी उपस्थित होते.
इतिवृत्तातील नोंदीवरून : सदस्य संतापले
ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथील स्वच्छतागृहाच्या कामाबाबत ग्रामसभेच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिल्या होत्या. पण नियमबाह्य स्वच्छतागृह हटविण्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी दिलेल्या आदेशाची चौकशी करण्यात यावी, असे वक्तव्य अध्यक्ष देशमुख यांच्या नावावर इतिवृत्तात स्थायीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी नोंदविल्याचे सभेत निदर्शनास आले. याबाबत अध्यक्षांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत, चुकीची वक्तव्ये इतिवृत्तात नोंदविणाºया अधिकाºयावर फौजदारी दाखल करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली. काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनीही, अध्यक्षांना अधिकारी बदनाम करीत असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला पदाधिकाºयांसह स्थायीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.

Web Title: Take action against those involved in the cycle fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.