सुरुल तलावातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा : गणेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:18+5:302021-04-24T04:27:18+5:30

ओळ : सुरुल (ता.वाळवा) येथे तहसीलदार गणेश शिंदे यांनी बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्या विद्युतपंपांची पाहणी केली. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Take action against those who illegally draw water from Surul Lake: Ganesh Shinde | सुरुल तलावातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा : गणेश शिंदे

सुरुल तलावातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा : गणेश शिंदे

Next

ओळ : सुरुल (ता.वाळवा) येथे तहसीलदार गणेश शिंदे यांनी बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्या विद्युतपंपांची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : भटवाडी (ता. शिराळा) गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या सुरुल (ता. वाळवा) येथील तलावातून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश तहसीलदार गणेश शिंदे दिले.

भटवाडी गावाला सुरुल येथील तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावाचे बॅकवॉटर करमाळे व भटवाडी (ता. शिराळा) हद्दीत येते तर बंधारा सुरुल (ता. वाळवा) हद्दीमध्ये आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मे महिन्यात पाणी कमी पडणार हे ध्यानात घेऊन भटवाडीचे सरपंच विजय महाडिक यांनी शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, वाळवा तहसीलदार रवींद्र सबनीस यांना भविष्यातील पाणीटंचाईबाबत यांना पत्र व निवेदनाद्वारे कळविले होते.

त्यानुसार तहसीलदार शिंदे यांनी शुक्रवारी सरपंच महाडिक व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत सुरुल तलावास भेट दिली. या भेटीदरम्यान तलावाच्या ठिकाणी विनापरवाना पाणी उपसा करणारे जवळपास आठ पाणी उपसा पंप दिसून आले. हे विनापरवाना पाणी उपसा पंप वेळीच बंद केले नाही तर भटवाडी गावाला भविष्यात पाणीपुरवठा करण्यास अडचणी येतील. हे लक्षात घेऊन तहसीलदार शिंदे यांनी सुरुल तलावातील विनापरवाना सुरू असलेल्या पाणी उपसा पंपमालकांवर कायदेशीर कारवाई करून पाणी उपसा पंप जप्त करावेत व तेथील विद्युत कनेक्शन बंद करावे, असे वाळवा तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

कोट

संबंधित तलाव वाळवा तालुका हद्दीत येत असल्यामुळे बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या पंपमालकांवर कारवाई करण्यासाठी वाळवा तालुक्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यानुसार त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल आणि त्याचबरोबर भटवाडी गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. पाणीटंचाई जाणवू दिली जाणार नाही.

गणेश शिंदे,

तहसीलदार शिराळा.

Web Title: Take action against those who illegally draw water from Surul Lake: Ganesh Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.