बलात्काराच्या खोट्या तक्रारी देणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:28 AM2021-01-25T04:28:25+5:302021-01-25T04:28:25+5:30

पाटील यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायदे मंडळाचा कायदा करण्याच्या हेतू समाजामध्ये सुव्यवस्था स्थापन व्हावी. अन्यायकारक ...

Take action against those who make false allegations of rape | बलात्काराच्या खोट्या तक्रारी देणाऱ्यांवर कारवाई करा

बलात्काराच्या खोट्या तक्रारी देणाऱ्यांवर कारवाई करा

Next

पाटील यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायदे मंडळाचा कायदा करण्याच्या हेतू समाजामध्ये सुव्यवस्था स्थापन व्हावी. अन्यायकारक प्रवृतीला पायबंद बसावा असा असतो; मात्र कायद्याचा हेतू जरी चांगला असला तरी प्रत्यक्ष त्याचा गैरवापर करणारे दृष्टप्रवृत्ती समाजामध्ये गावोगावी आढळून येत आहे. आता विनयभंगाच्या व खोट्या बलात्काराच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. स्त्रियांवर कोणीही अत्याचार करू नये म्हणून महिलांना कायद्याचे संरक्षण देण्याच्या सदहेतूने कडक कायदे करण्यात आले. परंतु या कायद्याचाही दुरुपयोग करण्याच्या महिलांची संख्या गावोगावी वाढू लागली. विनयभंगाच्या तक्रारी करण्यामध्ये उच्चशिक्षित महिलांची संख्या वाढू लागली आहे. ही खरी चिंतेची बाब आहे. अशा खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Web Title: Take action against those who make false allegations of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.