रिफ्लेक्टर नसलेल्या ऊस वाहनांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:51+5:302020-12-06T04:28:51+5:30
मुगाला ९५०० रुपये दर सांगली : येथील मार्केट यार्डात शनिवारी निघालेल्या कडधान्याच्या सौद्यात मुगाला प्रतिक्विंटल सात हजार १९६ ते ...
मुगाला ९५०० रुपये दर
सांगली : येथील मार्केट यार्डात शनिवारी निघालेल्या कडधान्याच्या सौद्यात मुगाला प्रतिक्विंटल सात हजार १९६ ते नऊ हजार ५०० रुपये दर मिळाला. सरासरी क्विंटलला आठ हजार ३८४ रुपये दर मिळाला आहे. पाच हजार ६८१ पोती मुगाची आवक झाल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
सोयाबीनला ४३५० रुपये दर
सांगली : येथील मार्केट यार्डात शनिवारी निघालेल्या सोयाबीनच्या सौद्यामध्ये प्रतिक्विंटल चार हजार ते चार हजार २०० रुपये दर मिळाला आहे. सरासरी चार हजार १०० रुपये दर मिळाला आहे. सहा हजार ६२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सोयाबीनमधील ओलावा कमी होत असल्यामुळे दरात वाढ झाली आहे.
उडीद ६५०० रुपये
सांगली : येथील मार्केट यार्डामध्ये कडधान्याचे शनिवारी सौदे निघाले. यामध्ये उडीदाला प्रतिक्विंटल सहा हजार ते सहा हजार ५०० रुपये दर मिळाला आहे. सरासरी सहा हजार २५० रुपये दर मिळाला आहे. एक हजार ६०७ क्विंटल उडीदाची आवक झाली होती.