कोरोना रुग्णांची माहिती न देणाऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:03+5:302021-05-24T04:26:03+5:30
टाकळीसह परिसरातील काही कोरोना रुग्ण मिरज व जयसिंगपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेत आहेत. मात्र अशा रुग्णांची माहिती ...
टाकळीसह परिसरातील काही कोरोना रुग्ण मिरज व जयसिंगपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेत आहेत. मात्र अशा रुग्णांची माहिती प्रयोगशाळा व संबंधित डॉक्टरांकडून लपवली जात आहे. कोरोनाबाधित काही रुग्णांची माहिती टाकळी येथे आरोग्य विभागात न दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. अशा घटना सर्वत्र घडत आहेत. याला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची माहिती डॉक्टर व प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागास कळविणे बंधनकारक असताना रुग्णांच्या भीतीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून ही माहिती लपवून रुग्णांवर परस्पर उपचार करून आर्थिक लुबाडणूक करीत आहेत. मात्र कोरोनाबाधित असल्याची माहिती लपवली जात असल्याने त्यांच्या संपर्कात अनेकजण येत आहेत. त्यामुळे अनेकजण कोरोनाबाधित होत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. मिरज बसस्थानक परिसरातील अशा काही डॉक्टरांमुळे एखादे कुटुंब होत उद्ध्वस्त होत असेल तर कोरोना रुग्णांची माहिती लपविणार्या प्रयोगशाळा व डॉक्टरांवर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे बंडगर यांनी सांगितले.