घरपट्टी सवलतीचा लाभ घ्या : राहुल रोकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:35+5:302021-03-06T04:25:35+5:30
------- वर्षा गुरव यांचा सत्कार (आयडेंटी फोटो ०५ वर्षा गुरव) सांगली : कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा बंद असल्यामुळे अनेक ...
-------
वर्षा गुरव यांचा सत्कार (आयडेंटी फोटो ०५ वर्षा गुरव)
सांगली : कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यास व शिक्षकांपासून दूर गेल्यामुळे संस्काराला मुकली आहेत. अशा वेळी फुपिरे (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ. वर्षा गुरव यांनी ऑनलाइन संस्कार वर्ग सुरू केले. रोज सायंकाळी विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ या पुस्तकातील पाठाचे वाचन करून त्यांच्यावर संस्कार केले. या उपक्रमाबद्दल शिराळ्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, साहित्यिक सुभाष कवडे यांच्यासह अनेकांनी त्यांचे कौतुक केले.
------
कचरा वर्गीकरण केंद्र हटवा
सांगली : जामवाडी परिसरातील ओला व सुका वर्गीकरण केंद्रामुळे नागरिकांना त्रास होत आहे. हे केंद्र तातडीने हलवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल हिप्परकर यांनी केली. आरोग्य अधिकारी डाॅ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त सहदेव कावडे व स्वच्छता निरीक्षकांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी वर्गीकरण केंद्रामुळे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगितले आहे. महापालिकेने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
---------
महापालिकेची सभा ऑनलाइनच
सांगली : महापालिकेची सभा ऑफलाइन घेण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत असली तरी नगर सचिव कार्यालयाकडून ऑनलाइन सभेचे नियोजन सुरू आहे. त्यात नव्याने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची ही पहिलीच सभा असेल. या सभेतील विषयावर भाजपचेही लक्ष असणार आहे.