कोरोनाचे संकट दूर कर, मारुतीराया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:11+5:302021-04-28T04:28:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘मारुतीराया... हे कोरोनाचे संकट दूर करावे आता’ असे साकडे शहरातील हनुमान मंदिरांमधील पुजाऱ्यांनी मंगळवारी ...

Take away the corona crisis, Maruthiraya! | कोरोनाचे संकट दूर कर, मारुतीराया!

कोरोनाचे संकट दूर कर, मारुतीराया!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ‘मारुतीराया... हे कोरोनाचे संकट दूर करावे आता’ असे साकडे शहरातील हनुमान मंदिरांमधील पुजाऱ्यांनी मंगळवारी घातले. शहरातील मंदिरांमध्ये साधेपणाने बंद दरवाजाआड हनुमान जयंती साधेपणाने साजरी झाली. सलग दोन वर्षे भाविकांना या कार्यक्रमांपासून दूर राहावे लागले.

रामनवमीपाठोपाठ हनुमान जयंतीलाही मंदिरांचे दरवाजे लॉकडाऊनमुळे बंद राहिले. शहरातील मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रतनशीनगरजवळी मारुती मंदिर, पंचशीलनगर, लक्ष्मीनगर, माधवनगर या ठिकाणच्या मारुती मंदिरातील पुजाऱ्यांनी जयंतीनिमित्त पूजाविधी पार पाडले. पहाटे साडेतीन वाजल्यापासून मंदिरांमध्ये तयारी सुरू होती. गाभारा व मूर्तीला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. रुद्राभिषेक, जन्मकाळ उत्सव, पाळणा, आरती, नैवेद्य अर्पण असे कार्यक्रम पार पडले.

सांगलीच्या पंचमुखी मारुती मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून पूजाविधी सुरू होता. मोजक्याच पाच लोकांच्या उपस्थितीत येथील कार्यक्रम पार पडले. हनुमान जयंतीनिमित्त पाळणा सजविण्यात आला होता. यावेळी बाबुराव पुजारी, अमोल पुजारी, वामन महिंदरकर, बाळू मुळे, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. अमोल पुजारी म्हणाले की, साधेपणाने जयंती साजरी करतानाच आम्ही मारुती चरणी कोरोनाचे संकट दूर व्हावे, म्हणून प्रार्थना केली. या संकटामुळे सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, म्हणून प्रार्थना करतानाच सर्व पूजाविधी परंपरेप्रमाणे करण्यात आले.

सलग दोन वर्षांपासून रामनवमी व हनुमान जयंतीचे कार्यक्रम रद्द झाले.

चौकट

मंदिराबाहेरून नमस्कार

भाविकांनी हनुमान जयंतीनिमित्त मंदिराच्या बाहेरूनच देवाचे दर्शन घेतले. अनेक मंदिरांबाहेरच नारळ, रुईच्या पानांचा हार, पुष्पहार, धूप, अगरबत्ती आदी साहित्य ठेवून हनुमान जयंतीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Take away the corona crisis, Maruthiraya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.