कुंडलमधील ओढ्याने घेतला मोकळा श्वास!

By admin | Published: June 9, 2016 01:04 AM2016-06-09T01:04:39+5:302016-06-09T01:15:44+5:30

तरुणांचा पुढाकार : पंच्याहत्तर वर्षांच्या ऐतिहासिक बंधाऱ्याचेही केले पुनरुज्जीवन - गुड न्यूज

Take a drift in the coil breathing empty! | कुंडलमधील ओढ्याने घेतला मोकळा श्वास!

कुंडलमधील ओढ्याने घेतला मोकळा श्वास!

Next

अशोक डोंबाळे -- सांगली --महिन्याभरापूर्वी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थान येथील अलवर जिल्ह्यातील तरुण जलविद्यापीठ येथे घेतलेल्या कार्यशाळेत कुंडल (ता. पलूस) येथील अ‍ॅड. दीपक लाड यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथून परतल्यानंतर त्यांनी कृतीतून ‘पाणी आणि पर्यावरण’ विषयावर त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. कुंडल गावातील पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा जुना कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आणि धारेचा गावओढा पाणवेली, प्लॅस्टिक कचऱ्याने मुजला होता. याचे काम हाती घेतले आणि लोकसहभागातून या ओढ्याने मोकळा श्वास घेतला.
कुंडलच्या ओढ्याची धारेचा ओढा अशी ओळख आहे. देवराष्ट्रे, कुंभारगाव येथील डोंगराचे दहा किलोमीटरपासून पाणी येत आहे. गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी औंध संस्थान आणि किर्लोस्कर कंपनी यांनी एकत्र येऊन कुंडल येथे १९४० मध्ये कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधला होता. पावसाळा संपल्यानंतर लाकडी फळ्यांच्या माध्यमातून पाणी साठविले जात होते. कालांतराने या ओढ्याकडे आणि बंधाऱ्याकडेही कुणाचे लक्ष गेले नाही. पंच्याहत्तर वर्षात हा बंधाराही प्रदूषणाच्या विळख्यात दिसेनासा झाला. पाणवनस्पती, त्यात गावाच्या प्लॅस्टिक कचऱ्याची भर पडल्यामुळे ओढ्याचे सौंदर्यही बकाल झाले होते. डॉ. राणा यांच्या कार्यशाळेतून परतल्यानंतर कुंडल येथील रणसंग्राम सोशल फौंडेशनच्या अ‍ॅड. लाड या तरूणाचे गावाच्या ओढ्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी २५ मेरोजी स्वच्छतेचे काम हाती घेतले.
गेल्या पंधरा दिवसांत अ‍ॅड. दीपक लाड यांनी गावातील तरुणांना एकत्र करून ओढा व बंधाऱ्याची स्वच्छता हाती घेतली आहे. सुमारे दोन किलोमीटर ओढ्याची स्वच्छता करून जुन्या ऐतिहासिक बंधाऱ्याचेही पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे. या सर्व कामास आतापर्यंत केवळ पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. यासाठी लोकशासन आंदोलनच्या अ‍ॅड. मनीषा रोटे यांचे पाठबळ मिळाले आहे. तरुणांनी जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतल्यामुळे रोटे यांनी जुन्या बंधाऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि लागणाऱ्या लाकडी फळ्यांसाठी २५ हजारांची मदत केली. या मदतीबरोबरच अर्जुन वडर, अ‍ॅड. अनिल लाड, विजय राजमाने, विश्वजित लाड, शाहीद मुल्ला, सौरभ हेगडे, मुकुंद खारगे, अनिल चव्हाण, श्रीकांत चव्हाण, राहुल देवकाते, हनिफ शेख, झुंझार शिंदे, मिलिंद रायते, ऋषिकेश मोहिते, अजित साळुंखे, निखिल सोळवंडे, डॉ. सोमनाथ सोळवंडे, वर्षा सनगर, मंजुश्री सनगर या तरुणांनी श्रमदान आणि खिशातील पैसे घालून काम हाती घेतले आहे. या तरुणांच्या कार्यास गावातूनही प्रतिसाद मिळण्याची गरज असून, कुंडल हे क्रांतिअग्रणींचे गाव असल्यामुळे तो निश्चित मिळेल, अशी अपेक्षा आहे. बंधाऱ्याला फळ्या बसविल्यामुळे पाण्याची बचत झाली.

Web Title: Take a drift in the coil breathing empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.