शहा म्हणाले की सांगली बाजारपेठेतील दुकाने उघडावीत; पण सम-विषम पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 01:29 PM2020-05-05T13:29:47+5:302020-05-05T15:27:47+5:30

शहा म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात व्यार्पा­यांनी दुकाने बंद ठेवून सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता काही

Take a look at how the idea of starting a liquor store came about .. what someone told someone! | शहा म्हणाले की सांगली बाजारपेठेतील दुकाने उघडावीत; पण सम-विषम पद्धतीने

शहा म्हणाले की सांगली बाजारपेठेतील दुकाने उघडावीत; पण सम-विषम पद्धतीने

Next
ठळक मुद्देसम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करावीत समीर शहा : पालकमंर्त्यांना निवेदन

सांगली : महापालिका क्षेत्रातील दुकाने सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशामुळे व्यार्पा­यांत संदिग्धता आहे. शहरातील व्यार्पा­यांना मदतीचा हात देण्यासाठी बाजारपेठेत समविषय पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. तसेच याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंर्त्यांना निवेदन पाठविले आहे.

शहा म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात व्यार्पा­यांनी दुकाने बंद ठेवून सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता काही शिथिलता देताना एकाकी आस्थापने व एकाच ओळीत असलेली पाच दुकाने चालू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. हा प्रकार घातकी ठरू शकतो. काही दुकानेच सुरू राहिल्याने तिथे गर्दी होऊ शकते. आजअखेर व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासन, पोलिसांशी वारंवार चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासनाला येथील अडचणी माहित असल्याने दुकाने सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासनाला देण्यात यावा.

संघटनेने सूचविलेले उपाय

  • केवळ शहरातर्गंत व्यापार सुरू करावा.
  • महापालिकेच्या सीमा सील ठेवाव्यात.
  • जिल्'ातून ग्राहक सांगलीत येणार नाही याची दक्षता घेऊ.
  • बाजारपेठेत समविषम पद्धतीने दुकाने सुरू करावीत.
  • एक आड एक दुकान चालू ठेवावे किंवा पाच दुकाने सुरू ठेवून त्यापुढील पाच दुकाने बंद ठेवावीत.
  • चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश बंदी राहील.
  • दुकानातील दोन कर्मचारी ग्राहकास सॅनिटायझर देऊनच आत सोडतील

 

Web Title: Take a look at how the idea of starting a liquor store came about .. what someone told someone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.