काेराेनाबाबत स्थानिक पातळीवर खबरदारी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:26 AM2021-05-10T04:26:41+5:302021-05-10T04:26:41+5:30
अंकलखाेप (ता. पलूस) येथे कदम यांनी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोना महामारीबाबत केलेल्या उपाय योजनांचा आढवा ...
अंकलखाेप (ता. पलूस) येथे कदम यांनी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने कोरोना महामारीबाबत केलेल्या उपाय योजनांचा आढवा घेतला. तसेच लवकरच अंकलखोप आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू केले जाईल, असे सांगितले.
यावेळी त्यांनी अंकलखोप व नागठाणे येथे नागरिक व प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कदम यांच्याकडे केली. यावेळी कडेगावचे विभागीय अधिकारी गणेश मरकड, विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार श्रीनिवास ढोणे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, भिलवडीचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सरपंच अनिल विभूते, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पवार, उपसरपंच विनय पाटील, तलाठी जयवंत सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी अमितकुमार सूर्यवंशी, ग्रामसेवक संग्रामसिंह सुतार, यांसह गावातील अनेक मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अनेक नागरिक उपस्थित होते.