नव्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:06+5:302021-02-05T07:18:06+5:30

रामानंदनगर (ता. पलूस) येथे आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना 'शेतकरी व कामगारविरोधी कायदे' या विषयावर ते ...

Take to the streets against the new agricultural laws | नव्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरा

नव्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरा

Next

रामानंदनगर (ता. पलूस) येथे आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना 'शेतकरी व कामगारविरोधी कायदे' या विषयावर ते बोलत होते. समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच, श्री समर्थ साहित्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पलूस ,व्ही. वाय. पाटील प्रबोधन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.

ॲड. के. डी. शिंदे म्हणाले की शेती हा विषय राज्य सरकारच्या सूचीतील विषय असून, राज्यांचे अधिकार डावलून केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे करणे हेच भारतीय संविधानाला छेद देणारे आहे. कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना या कायद्याचा काढलेला वटहुकूम सुद्धा बेकायदेशीर आहे. या कायद्याने बळिराजा उद्ध्वस्त होईल.

यावेळी व्ही. वाय. पाटील, मारुती शिरतोडे, ॲड. अभिषेक खोत, प्रा. आदम पठाण, संभाजी सदामते, उत्तम सदामते, मारुती सावंत, दिलीप पाटील, बाबूराव पाटील, मानसिंग पाटील उपस्थित होते.

चाैकट

शेती उद्ध्वस्त होणार

आज देशातील लाखो शेतकऱ्यांनी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. आता या शेतकरीविरोधी कायद्याचे परिणाम दहा वर्षांनी पाहायला मिळतील. तेव्हा या देशातील शेतीचे पूर्ण कंपनीकरण होऊन शेतकरी उद्ध्वस्त झालेला असेल.

फोटो-३१सावंतपूर१

फोटो ओळ : रामानंदनगर (ता. पलूस) येथे आयोजित आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमाले ॲड. के. डी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Take to the streets against the new agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.