शिक्षकांच्या वेतन निश्चितीचे पडताळणी शिबिर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:02+5:302021-08-20T04:31:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतन निश्चितीसाठी पडताळणी शिबिर घ्यावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतन निश्चितीसाठी पडताळणी शिबिर घ्यावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांनी जतचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांच्याकडे केली आहे.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी खरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग २०१६पासून जाहीर केला आहे. मात्र, वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी २०१९पासून केली आहे. वेतन आयोग लागू करताना वेतन निश्चिती करणे आवश्यक असून, ती केली आहे. मात्र वेतन निश्चिती झाल्यानंतर वेतन पडताळणी सहा महिन्यांत करणे अपेक्षित असताना जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही. जत शिक्षण विभागाने शिक्षकांची सेवापुस्तके जिल्हा परिषद लेखा विभागाकडे पाठवून लवकरच वेतन पडताळणी करून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी खरात यांनी जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करून शिक्षकांची वेतन पडताळणी करून घेण्यात येईल. त्यासाठी तत्काळ शिबिरही घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष अविनाश सुतार, जितेंद्र बोराडे, बाळासाहेब सोलनकर, रावसाहेब चव्हाण, विनोद कांबळे, शिक्षण विभागातील लिपिक संतोष गरुड, आर. डी. कांबळे यावेळी उपस्थित होते.