फाळकेवाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला तलाठी, कोतवालांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:42+5:302021-05-05T04:45:42+5:30
आष्टा : फाळकेवाडी (ता. वाळवा) येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तलाठी व कोतवाल यांनी पाहणी दौऱ्याला दांडी मारल्याने ...
आष्टा :
फाळकेवाडी (ता. वाळवा) येथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तलाठी व कोतवाल यांनी पाहणी दौऱ्याला दांडी मारल्याने त्यांच्यावर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी दक्षता समितीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे केली आहे.
फाळकेवाडी, चंदवाडी, चांदोली वसाहत या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून संसर्ग वाढू नये, याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. तलाठी व्ही. टी. गुरव व कोतवाल शिवाजी जाधव यांना आपत्ती व दक्षता समितीच्या बैठकीवेळी सूचना देऊनही ते कायम गैरहजर राहतात. मंगळवार, ४ रोजी तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार प्रशांत देशपांडे फाळकेवाडी दौऱ्यावर आले असता, गुरव व जाधव गैरहजर होते. गावात जनजागृती करण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच शिवाजी आपुगडे, उपसरपंच संदीप काटकर, ग्रामसेवक दीपाली मोहिते, विपुल चंद, आशा वर्कर सावित्री काटकर यांच्यासह सदस्यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे दोघांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
फोटो: फाळकेवाडी येथे ग्रामदक्षता समितीच्यावतीने गावात जनजागृती करताना सरपंच शिवाजीराव आपुगडे, उपसरपंच संदीप काटकर, ग्रामसेविका दीपाली मोहिते.