सांगली- रामापूरचा तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:48 PM2018-10-01T16:48:45+5:302018-10-01T16:50:50+5:30
सात बारा वरील इ करारची नोंद कमी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रामापूर तालुका कडेगाव येथील तलाठी सुरेश सुखदेव रुपनर (वय -५१ ) या लाचखोर तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक
सांगली : सात बारा वरील इ करारची नोंद कमी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रामापूर तालुका कडेगाव येथील तलाठी सुरेश सुखदेव रुपनर (वय -५१ ) या लाचखोर तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले
या तलाठ्याने रामापूर येथील एका शेतकऱ्याच्या सात - बारा उतारावरील इ कराराची नोंद कमी करण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबधीत शेतकऱ्याने रविवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड तक्रार दिली होती .
यानंतर लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सापळा लावला होता . यावेळी तक्रारदार शेतकरी यांचेकडुन तलाठी सुरेश रुपनर याने ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताच सापळा रचून बसलेल्या एसीबीच्या पथकाने रुपनर रंगेहात पकडले व अटक केली.
याप्रकरणी आरोपी सुरेश सुखदेव रुपनर याचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली चिंचणी (वांगी ) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई पोलीस उप आयुक्त संदीप दिवाण ,राजकुमार गायकवाड अप्पर पोलीस उप आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र तेंडुलकर पोलीस उप अधिक्षक , अविनाश सागर ,संजय कलकुटगी ,राधिका माने ,जितेंद्र काळे ,संजय संकपाळ ,भास्कर भोरे ,बाळासाहेब पवार यांनी केली आहे .