तलाठी, मंडल कार्यालयातील झिरो तलाठी गायब

By Admin | Published: November 10, 2015 10:23 PM2015-11-10T22:23:02+5:302015-11-11T00:13:47+5:30

मिरज तहसीलदारांचा दणका : नागरिकांची अडवणूक व आर्थिक लुटीच्या तक्रारी

Talati, Jhrolo Talathi from Mandal office disappeared | तलाठी, मंडल कार्यालयातील झिरो तलाठी गायब

तलाठी, मंडल कार्यालयातील झिरो तलाठी गायब

googlenewsNext

मालगाव : तलाठी व मंडल कार्यालयात अधिकारी म्हणून मिरविणाऱ्या झिरो तलाठ्यांच्या कारनाम्यांची वेळाने का असेना, महसूल विभागाला दखल घ्यावी लागली आहे. तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात झिरो तलाठी व खासगी उमेदवारांची नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारल्याने तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयातून झिरो तलाठी गायब झाले आहेत.
मिरज तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात कामकाजाच्या मदतीसाठी झिरो तलाठी व खासगी उमेदवारांच्या नेमणुका केल्या होत्या. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी सुचविलेलीच उतारे, सात-बारा व दाखले ही कामे त्यांच्याकडून करवून घेतली जात असत. मात्र तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या झिरो तलाठ्यांनी कामकाजात नागरिकांची अडवणूक व आर्थिक लूट सुरु केल्याच्या तक्रारी वाढल्याने, महसूल विभागाने यापूर्वी नियमबाह्य नेमणुकांची दखल घेत झिरो तलाठी व खासगी उमेदवारांना तलाठी व मंडल कार्यालयात नेमणुकीस पायबंद घालण्याचा आदेश दिला होता. मात्र तलाठी, मंडल अधिकारी व झिरो तलाठी यांचे चांगले संबंध जुळल्याने, वरिष्ठांचा आदेश धुडकावत सर्वच तलाठी कार्यालयात झिरो तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात खासगी उमेदवारांच्या मदतीने कारभार सुरुच ठेवला होता. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी शासकीय दफ्तर खासगी माणसाच्या ताब्यात देणे गैर असताना, कार्यालयातील संपूर्ण दफ्तरच त्यांच्या ताब्यात देण्याचे धाडस केल्याने, झिरो तलाठीच कारभारी झाले होते. त्याचा फटका तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना बसला आहे. या गंभीर प्रकाराची मिरजेचे तहसीलदार किशोर घाडगे यांनी गंभीर दखल घेत, झिरो तलाठी व खासगी उमेदवारांची नेमणूक करणाऱ्या तलाठी व मंडल अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
तहसीलदारांच्या दणक्याने तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात ठाण मांडून शेतकऱ्यांची अडवणूक व आर्थिक लूट करणारे झिरो तलाठी व खासगी उमेदवार गायब झाले आहेत. (वार्ताहर)

अधिकारी त्रस्त
झिरो तलाठी व खासगी उमेदवारांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या परस्पर पैसे घेऊन काम न करणे, तसेच परस्पर नोंदीचे गैरप्रकार करणे, या प्रकारामुळे संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांची झोपच उडाली होती.

Web Title: Talati, Jhrolo Talathi from Mandal office disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.