अफगाण संसदेवर तालिबानचा हल्ला
By admin | Published: June 22, 2015 11:56 PM2015-06-22T23:56:59+5:302015-06-22T23:56:59+5:30
रमजानच्या काळात दहशतवाद्यांनी हल्ले करू नयेत , हे अफगाण धार्मिक नेत्यांचे आवाहन झुगारून तालिबानी दहशतवाद्यांनी सोमवारी अफगाण संसदेवर
सांगली/विटा : बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिवरे (ता. खानापूर) येथे रविवारी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निशिगंधा बाळासाहेब शिंदे (२८,रा. हिवरे) या महिलेचाही सोमवारी पहाटे सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. तब्बल २० तास त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाली आहे. एकाच कुटुंबातील माय-लेकीचा व सुनेचा मृत्यू झाल्याने हिवरे गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार सुधीर सदाशिव घोरपडे (रा. धोंडेवाडी) याला फिटचा त्रास असल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे विटा पोलिसांनी सांगितले.
हिवरे येथील ब्रह्मदेव शिंदे यांच्या शेतातील घरात रविवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांची पत्नी प्रभावती शिंदे, सून नशिगंधा बाळासाहेब शिंदे व मुलगी सुनीता संजय पाटील (रा. वायफळे, ता. तासगाव) यांच्यावर तिघांनी धारदार चाकूने वार केले होते. त्यात प्रभावती व सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची सून निशिगंधा गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी निशिगंधा यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता त्यांचा मृतदेह हिवरे गावात घरी आणण्यात आला. त्यावेळी उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थांना शोक अनावर झाला. निशिगंधा यांना दोन महिन्याची मुलगी आहे. हत्याकांडावेळी ही चिमुरडी पाळण्यात झोपलेली होती. या चिमुरडीला पाहून उपस्थितही गहिवरून गेले. सोमवारी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संशयित मुख्य सूत्रधार सुधीर घोरपडे (रा. धोंडेवाडी) रवींद्र कदम ( भूड) व मतकुणकी येथील अल्पवयीन संशयित या तिघाची पोलिसांकडृून कसून चौकशी केली जात आहे. (वार्ताहर)
वाद कोणाचा, शिक्षा कोणाला?
एक रुग्णालयात, दुसरा कोठडीत
धोंडेवाडी येथील सुधीर घोरपडे तिहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आहे. बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने रवींद्र कदम व अजित पाटील यांची मदत घेऊन रविवारी सकाळी ब्रह्मदेव शिंदे या बहिणीच्या चुलत सासऱ्याच्या घरातील तिघींचा गळा चिरला. त्यानंतर तो पळून जात असताना त्याला जरंडी पत्रा येथे लोकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी त्याने फिटचा त्रास असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दुसरा संशयित रवींद्र कदम यास सोमवारी विटा न्यायालयात हजर केले असता, १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तिसऱ्या अल्पवयीन संशयितास सोमवारी सायंकाळी पाच वाजता विट्यातून सांगलीला पाठविण्यात आले आहे.