पांढरेवाडीतून माणगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची वाताहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:16+5:302021-09-27T04:29:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथे पावसाचे पाणी पांढरेवाडी ते माणगंगा नदीपर्यंत एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथे पावसाचे पाणी पांढरेवाडी ते माणगंगा नदीपर्यंत एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरून वाहत असल्याने पांढरेवाडीसह मिसाळवस्ती, रानमळा, पुजारवाडी आदी भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने चालत जाणेही कठीण होत आहे.
दिघंची ते पुजारवाडी हे पाच किलोमीटरचे अंतर आहे. दिघंचीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. जवळचा मार्ग असल्याने चालत जाणारे नागरिकही याच मार्गाने जातात. परंतु सध्या या रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांची गैरसाेय हाेत आहे. पांढरेवाडीपासून माणगंगा नदीपर्यंत एक किलोमीटरचे अंतर असून पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण रस्ता उखडला आहे. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. दिघंची ते पांढरेवाडी या मार्गाने पांढरेवाडी येथे भवानी मळा येथील प्रसिद्ध भवानीमाता मंदिर, पुजारवाडी येथील गोयाबा मंदिर येथे नेहमी भाविक येत असतात. त्यांचीही गैरसोय होत आहे
चौकट
रस्ता सुरळीत करा
पांढरेवाडीपासून माणगंगा नदीपर्यंत रस्ता करण्यात यावा. रस्त्याकडील झाडे काढण्यात यावीत. रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यासाठी चर मारून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
फोटो : २६ दिघंची २
ओळी : पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथे माणगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे.
260921\img_20210926_165715.jpg
पांढरे वाडी बातमी फोटो