तांदुळवाडी परिसरात नदीकाठी आणि शेती-शिवारात रंगू लागल्या पाट्र्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:29+5:302021-04-13T12:41:29+5:30
Farmer Sangli: तांदुळवाडी (ता. वाळवा) गावासह परिसरातील युवकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कधीही लॉकडाऊन पुकारला जाईल, हे गृहित धरून आतापासूनच शेत-शिवार आणि नदीच्या काठाला पाट्र्या रंगू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पत्रावळ्या आणि बाटल्यांचे ढीग दिसून येत आहेत. युवकांचा हा मनमौजीपणा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) गावासह परिसरातील युवकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कधीही लॉकडाऊन पुकारला जाईल, हे गृहित धरून आतापासूनच शेत-शिवार आणि नदीच्या काठाला पाट्र्या रंगू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पत्रावळ्या आणि बाटल्यांचे ढीग दिसून येत आहेत. युवकांचा हा मनमौजीपणा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
वीकेंड लॉकडाऊनमध्ये ढाबे व हॉटेलधारकांनी ग्राहकांना पार्सल देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा १५ दिवसांचा पुढील लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता शासनस्तरावर सुरू असल्याचे चर्चा आणि बैठकांमधून दिसून येत आहे. यामुळे तांदुळवाडी परिसरातील युवकांनी, लॉकडाऊन कधीही लागू दे, पाट्र्या मात्र झोडायच्याच, या इराद्याने प्रत्येक रात्रीचे वेळापत्रक ठरवून टाकले आहे.
तांदुळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, कणेगाव, भरतवाडी, बहादूरवाडी आदी गावे येतात. या गावांमधील बरेच युवक हे वाढदिवस, लग्न, तसेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्तच्या पाट्र्या आयोजित करतात. ही गावे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न आहेत. त्यामुळे हॉटेल्स व ढाबे महामार्गालगत असल्याने वेगवेगळ्या प्रसंगावरून युवकांच्या भाेजन पाट्र्या जोरात रंगत होत्या.
पण मागील आठवड्यात शासनाच्यावतीने वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामध्ये ढाबे व हॉटेलधारकांनी ग्राहकांना पार्सल योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर युवकांनी शेत-शिवाराबरोबरच नदीकाठी भाेजनावळीच्या पाट्र्यांचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. यादरम्यान काही युवक शेतात लावलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीची वेळ निश्चित करत आहेत. त्यामुळे पार्टीही आणि पिकाला पाणीही, दोन्ही कामे उरकून घेतली जात आहेत. शासनाच्या पार्सल देण्याच्या निर्णयामुळे ढाबे व हॉटेल धारकांवर मात्र संक्रांत कोसळली आहे.