सांगलीत उपनगरांमध्ये टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:18+5:302021-07-26T04:25:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगली शहराला महापुराचा तडाखा बसल्याने पुरामुळे पाणीपुरवठा उपसा करण्यास पाणीपुरवठा विभागाला अडथळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगली शहराला महापुराचा तडाखा बसल्याने पुरामुळे पाणीपुरवठा उपसा करण्यास पाणीपुरवठा विभागाला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे सांगली शहरासह उपनगरांमध्ये पाणीपुरवठा बंद आहे. महापालिकेतर्फे उपनगरांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
महापुराचा फटका सांगली शहरातील पाणीपुरवठ्यास बसला आहे. उपनगरे व कुपवाड शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा विभागाला सांगली शहरात कुपवाड व उपनगरांमध्ये संजयनगर, चैतन्यनगर, साठेनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, चिंतामणनगर, कॉलनी शिंदे, मळा यशवंतनगर, वसंतनगर, हनुमाननगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.