तासगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:27+5:302021-05-25T04:30:27+5:30
तासगाव : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे तासगावसह जिल्ह्यातील ...
तासगाव : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे तासगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समितींत कोविड सेंटर उभे करावेत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांत ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचे आदेश द्यावेत. तसेच तासगाव येथील महिला तंत्रनिकेतनमध्ये सुरू असलेल्या नगर परिषदेच्या सेंटरमध्ये नाममात्र दराने शुल्क आकारणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी निवेदनाद्वारे यांनी केली आहे.
या मागण्याचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधारी यांच्याकडे दिले आहे. सध्या तासगाव तालुक्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील बाजार समितीत कोविड सेंटर उभे करण्याचे आदेश द्यावेत, तसेच साखर कारखान्यांतून ऑक्सिजनचे प्लांट उभा करावेत, अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली.
तासगाव येथील महिला तंत्रनिकेतनमध्ये नगर परिषदेच्या वतीने कोरोनो सेंटर सुरू आहे. या सेंटरमध्ये रुग्णांकडून नाममात्र दराने शुल्क आकारणी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी राहुल शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.