तासगाव-कवठेमहांकाळमध्ये संजयकाका पाटील यांचा बालेकिल्ला अभेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 04:46 PM2019-05-24T16:46:55+5:302019-05-24T16:50:55+5:30

लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांनी सलग दुसºयांदा बाजी मारताना, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचा बालेकिल्ला अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकरांच्या फॅक्टरने स्वाभिमानी शेतकरी

Tasgaon-Kavte-Mahalakshi Sanjaykaka Patil's Citadel Impenetrable | तासगाव-कवठेमहांकाळमध्ये संजयकाका पाटील यांचा बालेकिल्ला अभेद्य

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये संजयकाका पाटील यांचा बालेकिल्ला अभेद्य

Next
ठळक मुद्दे मात्र या मतदारसंघात खासदार पाटील यांची व्होट बॅँक एकसंध राहिली. याउलट राष्टवादीच्या व्होट बँकेत मतविभागणी झाली


सांगली : लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांनी सलग दुसºयांदा बाजी मारताना, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचा बालेकिल्ला अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकरांच्या फॅक्टरने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील बॅकफूटवर गेले. खासदारांच्या विरोधात असणाºया राष्टÑवादीच्या मतांची झालेली विभागणी भाजपच्या पथ्यावर पडल्याचे चित्र निकालानंतर दिसून आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. हा मतदारसंघ खासदार पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच या ठिकाणी लक्ष केंद्रीत केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांची या मतदारसंघातील मदार राष्टवादीवर अवलंबून होती.

राष्टवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदा वसंतदादा घराण्यातील उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी तासगावात सभा घेतली होती. खासदार पाटील यांना अपेक्षित मताधिक्य मिळू द्यायचे नाही, यासाठी राष्टÑवादीकडून जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र खासदार पाटील यांचा गेल्या पाच वर्षांतील मतदारसंघातील जनसंपर्क, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे करून ठेवलेला जनसंपर्क यावेळी कामी आला. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीसारखा मोदी फॅक्टर दिसून आला नाही. मात्र खासदार पाटील यांनी केलेल्या कामाची पोहोच मतदारांनी दिली.

दुसरीकडे राष्टवादीवर भिस्त असणाºया विशाल पाटील यांना गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा फटका बसला. पडळकरांची उमेदवारी खासदार पाटील यांना अडचणीत आणू शकते, अशी चर्चा होती. मात्र या मतदारसंघात खासदार पाटील यांची व्होट बॅँक एकसंध राहिली. याउलट राष्टवादीच्या व्होट बँकेत मतविभागणी झाली. त्यामुळे विशाल पाटील यांना अपेक्षित मतदान होऊ शकले नाही.

Web Title: Tasgaon-Kavte-Mahalakshi Sanjaykaka Patil's Citadel Impenetrable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.