तासगाव मांजर्डे-मोराळे रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:15+5:302021-02-18T04:50:15+5:30
मांजर्डे ते मोराळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. वारंवार मागणी करून सुद्धा रस्त्याचे काम होत नव्हते. याचा त्रास ...
मांजर्डे ते मोराळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. वारंवार मागणी करून सुद्धा रस्त्याचे काम होत नव्हते. याचा त्रास प्रवासी वर्गाला होत होता.
जानेवारी महिन्याच्या शेवटी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले. रस्त्याचे काम निकृष्ट सुरू आहे. रस्त्यावर मोठी खडी टाकण्यापूर्वी डांबर वापरणे आवश्यक असते. कामात डांबराचा वापर केलेला दिसत नाही.
डंपरमधून खडी आणून रस्त्यावर ढीग घातले आहेत. खडी विस्कटण्यापूर्वी डांबर वापरले नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थानीं केल्या आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून, बांधकाम विभागाचे या कामाकडे सोईस्कर दुर्लक्ष असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.
या कामामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व दर्जेदार काम करावे, अशी मागणी होत आहे. काम सुरू असताना अधिकारी दिसलेच नाहीत. या कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी कोण आहेत हे सुद्धा अनेकांना माहिती नाही.
चौकट
ठेका एकाचा, काम दुसऱ्याचे
रस्त्याच्या कामाचा ठेका घेणारा ठेकेदार एक असून, प्रत्यक्ष काम करणारा सबठेकेदार वेगळाच असल्याची चर्चा आहे. यामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे.