करवसुलीसाठी तासगाव नगरपालिका प्रशासन आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:19+5:302021-03-19T04:25:19+5:30
तासगाव : मार्चअखेर वार्षिक कर वसुलीसाठी तासगाव नगरपालिका प्रशासनाने आक्रमक भूमिक घेतली आहे. कर वसुलीसाठी प्रशासन अक्षरशः रस्त्यावर ...
तासगाव : मार्चअखेर वार्षिक कर वसुलीसाठी तासगाव नगरपालिका प्रशासनाने आक्रमक भूमिक घेतली आहे. कर वसुलीसाठी प्रशासन अक्षरशः रस्त्यावर उतरले आहे. नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ४० टक्के वसुली झाली आहे.
लवकरच १०० टक्के कर वसुली होईल, असा विश्वास नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर कर न भरणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
करवसुलीसाठी कार्यालय अधीक्षक श्वेता कुंडले, नगररचनाकार संकेत हळीकर, लेखापाल सुयश कुलकर्णी, संगणक अभियंता प्रशांत भोसले, कर अधीक्षक धनश्री पाटील,
राजू माळी, राजू काळे, अनिल कोळी, संजय सूर्यवंशी, संतोष गायकवाड, महादेव लुगडे, रवी म्हेत्तर, शंकर देवकुळे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लोकांच्या दारात जाऊन वसुली सुरू केली आहे.
तासगाव शहरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिद्धेश्वर रोड, वंदे मातरम चौक, जोशी गल्ली, गणपती मंदिर, गुरुवार पेठ, बसस्थानक चौक, बागणी चौक, सोमवार पेठ, स्टेशन रोड या प्रमुख रस्त्यांसह शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर, गल्लीत अधिकारी व कर्मचारी करवसुली करत असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे कर वसुलीला फटका बसला होता. त्याचा मोठा परिणाम विकासकामांवर झाला होता. मात्र यावर्षी कोरोनाच्या धक्क्यातून सावरणारे तासगावकर करवसुलीसाठी सहकार्य करत आहेत.