सावळजमध्ये पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 12:54 PM2022-02-05T12:54:57+5:302022-02-05T12:56:03+5:30

आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

Tasgaon police arrested two criminals with two indigenously made pistols and two notorious criminals at Savlaj | सावळजमध्ये पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक

सावळजमध्ये पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक

Next

तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथे देशी बनावटीच्या दोन पिस्तुलांसह दोन काडतुसे तसेच दोघा अट्टल गुन्हेगारांना तासगाव पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. अर्जुन सुरेश कसबे (वय २२, रा. मणेराजुरी ता. तासगाव) व राम जंबू भोरे (वय २३, रा. सावळज ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सावळज येथे दोघेजण देशी बनावटीची पिस्तुले विक्रीसाठी आली असल्याची माहिती तासगाव पोलिसांना मिळाली. यानुसार सावळज ते अंजनी रस्त्यावर एका पेट्रोलपंपासमोर उभ्या असलेल्या अर्जुन कसबे व राम भोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे ८० हजार ४०० रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली.

या संशयितांकडे तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन केराम करत आहेत. या कारवाईत रमेश चव्हाण, सागर लवटे, सोमनाथ गुंडे, सतीश खोत, विनोद सकटे, दत्तात्रेय जाधव, अशोक सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Tasgaon police arrested two criminals with two indigenously made pistols and two notorious criminals at Savlaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.