तासगावचा गुलाब ठरला ‘किंग आॅफ द शो’
By admin | Published: January 10, 2016 12:58 AM2016-01-10T00:58:11+5:302016-01-10T00:58:52+5:30
निकाल जाहीर : संजय घोडावत यांच्या गुलाबाला ‘क्विन आॅफ द शो’ किताब, प्रदर्शन पाहण्यास गर्दी
सांगली : दि सांगली रोझ सोसायटी व मराठा समाजतर्फे आयोजित गुलाबपुष्प स्पर्धेत तासगावच्या सुरेश माईणकर यांच्या गुलाबाला यंदाच्या ‘किंग आॅफ द शो’चा, तर जयसिंगपूरचे उद्योजक संजय घोडावत यांच्या गुलाबास ‘क्विन आॅफ द शो’चा मान मिळाला. गार्डन कन्सेप्टच्या गुलाबाने ‘प्रिन्स आॅफ द शो’चा, तर पुण्यातील अपूर्व नर्सरीच्या गुलाबाने ‘प्रिन्सेस आॅफ द शो’चा किताब पटकाविला.
येथील मराठा समाज भवनात गुलाबपुष्प प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन सकाळी पार पडले. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनात तासगाव, जयसिंगपूर, आष्टा, पुणे, कोंडिग्रे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. ७० प्रकारच्या फुलांचा प्रदर्शनात समावेश आहे. लाल, पिवळा, गुलाबी, नारंगी तसेच मिश्ररंगी गुलाब, जर्बेरा, आॅर्किड, कार्नेशन, शेवंती यासह बोन्सायचे विविध २० प्रकार या प्रदर्शनात दाखल आहेत. पंच म्हणून प्रा. अजित पाटील, प्राचार्य प्रकाश मद्वाण्णा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
डिस्प्ले पुष्प मांडणी
प्रथम - श्रीवर्धन बायोटेक, कोंडिग्रे
फुले विक्रेत्यांसाठी स्पर्धा
प्रथम - जापनिज् फ्लॉवर, कोंडिग्रे
ग्लॅडिएटर
प्रथम - रवींद्र माईणकर
ग्रीन हाऊसमधील गुलाब
प्रथम - संजय घोडावत ग्रुप, जयसिंगपूर
जर्बेरा
प्रथम - संजय घोडावत ग्रुप
पुष्परचना (सर्वांसाठी)
प्रथम - लीना कांबळे
पुष्परचना (पंधरा वर्षाखालील मुलांसाठी)
प्रथम - तिर्थेश पाचोरे
पुष्परचना (मतीमंद मुलांसाठी)
प्रथम- स्वानंद फडणीस
पुष्परचना (पुष्परचना)
प्रथम - पूजा आडसुळे
फुलांची रांगोळी
प्रथम - वेदिका फडके