तातोबा बदामे यांची ‘शिविम’च्या कार्यकारिणीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:49+5:302021-02-13T04:24:49+5:30
‘शिविम’ ही संघटना महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. तासगावात दि. ६ व ७ ...
‘शिविम’ ही संघटना महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. तासगावात दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘शिविम’च्या दहाव्या अधिवेशनात डॉ. बदामे यांची कार्यकारिणीवर एकमताने निवड करण्यात आली. गेली सोळा वर्षे ते पदवी व पदव्युत्तर मराठी विभागात अध्यापन करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी शोधनिबंधांचे वाचन केलेले आहे. यापूर्वी ते थायलंड अभ्यासदौऱ्यावर जाऊन आले आहेत. शिवाजी विद्यापीठाने त्यांना मराठी विषयासाठी रिसर्च गाईड म्हणून मान्यता दिलेली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे व प्राध्यापकांनी त्यांचा महाविद्यालयात सत्कार केला. या निवडीबद्दल त्यांचे डॉ. शहाजी पाटील, प्रा. ए. एस. पाचोरे, प्रा. जे. ए. यादव, प्रा. डॉ. बी. टी. कणसे, पी. आर. खाडे, प्रा. ए. के. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
फाेटाे : १२ ताताेबा बदामे