नाकाबंदीवरील शिक्षकाला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:59 AM2020-05-12T11:59:10+5:302020-05-12T17:54:38+5:30

सांगली जिल्ह्यात पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतनीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला ट्रक चालकाने चिरडले. या घटनेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

The teacher on the blockade was crushed by the truck | नाकाबंदीवरील शिक्षकाला ट्रकने चिरडले

नाकाबंदीवरील शिक्षकाला ट्रकने चिरडले

googlenewsNext
ठळक मुद्देनाकाबंदीवरील शिक्षकाला ट्रकने चिरडलेट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात डफळापूरनजीक कारवाईवेळी घडली दुर्घटना

डफळापूर (जि. सांगली) : शिंगणापूर (ता. जत) येथील चेकपोस्टवर कार्यरत असताना भरधाव जाणाऱ्या ट्रकला अडविण्याच्या प्रयत्नात एक शिक्षक त्याच ट्रकखाली चिरडून ठार झाला. नानासाहेब सदाशिव कोरे (वय ३४, रा. डफळापूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मंगळवार, दि. १२ रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर ट्रक चालक हणमंत रामचंद्र मोर्डी (रा. दौंड, पुणे) हा जत पोलिसात हजर झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिंगणापूर येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांसह एक डॉक्टर, दोन शिक्षक, दोन ग्रामपंचायत कर्मचारी, दोन पोलिसपाटील, दोन डाटा आॅपरेटर तैनात असतात. येथे पाच दिवसांपासून नानासाहेब कोरे हे कार्यरत होते.

मंगळवारी पहाटे शिरोळहून एका टेम्पोतून २४ कामगार गुगवाड (ता. जत) येथे  निघाले होते. त्यांना होम क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया शिंगणापूर चेकपोस्टवर सुरू होती. याच दरम्यान कर्मचारी कामात व्यस्त असताना कर्नाटकमधून सिमेंट घेऊन भरधाव आलेले ट्रक (क्र. एम. एच. १२, एल. टी. ९७४९) चेकपोस्टवर न थांबता थेट डफळापूरच्या दिशेने गेला.

यावेळी नानासाहेब कोरे व जिरग्याळ येथील डाटा आॅपरेटर संजय चौगुले यांनी दुचाकीवरून (क्र. एम. एच. १०, ए. झेड. ८७४३) ट्रकचा पाठलाग सुरू केला. डफळापूर-सांगली मार्गावर डफळापूरनजीक एका वळणावर त्यांनी दुचाकी ट्रकच्या पुढे नेत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकची दुचाकीला धडक बसून नानासाहेब कोरे ट्रकखाली चिरडले गेल्याने ते जागीच ठार झाले, तर संजय चौगुले बाजूला फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले.

जतचे गटविकास अधिकाऱ्यांनी नानासाहेब कोरे यांची शिंगणापूर चेकपोस्टवर नेमणूक केली होती. पाच दिवस त्यांनी तेथे सेवा बजावली. कोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी भेट दिली. जत पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके अधिक तपास करीत आहेत

Web Title: The teacher on the blockade was crushed by the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.