नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला शिक्षक समिती-सयाजीराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:04 PM2020-10-22T20:04:14+5:302020-10-22T20:07:04+5:30

farmar, rain, teacher, sanglinews अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पुढाकार घेतला आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे समितीचे राज्य संघटक सयाजीराव पाटील यांनी ही माहिती दिली.

Teachers committee to help the affected farmers | नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला शिक्षक समिती-सयाजीराव पाटील

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला शिक्षक समिती-सयाजीराव पाटील

Next
ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला शिक्षक समिती-सयाजीराव पाटील यांची माहिती शिक्षक, कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी

सांगली : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पुढाकार घेतला आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे समितीचे राज्य संघटक सयाजीराव पाटील यांनी ही माहिती दिली.

पाटील म्हणाले की खरिप पिकाच्या काढणीवेळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन भुईमूग करडई मुग कापूस यासह द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या काळात मदतीला धावलेला शेतकरी पावसामुळे मात्र पुरता खचून गेला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात तात्काळ मदत करावी अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली.

समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कोंबे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यातील प्राथमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांसाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. या वेतनातून जमा होणारा निधी केवळ शेतकऱ्यांसाठी उपयोगात आणावा अशी विनंती केली आहे. शेतकरी अडचणीत असताना त्याला पुन्हा उभा करण्यासाठी शिक्षकांच्याकडून योगदान दिले जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Teachers committee to help the affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.