शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे शिक्षकांचे पगार लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:47+5:302021-04-22T04:27:47+5:30
सांगली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मार्चचा पगार एप्रिल संपत आला तरीही मिळालेला नाही. विलंबामुळे ...
सांगली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मार्चचा पगार एप्रिल संपत आला तरीही मिळालेला नाही. विलंबामुळे शिक्षकांनी घेतलेल्या कर्जावर व्याज, दंडाचा बोजा वाढत आहे.
दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होत आहेत. सणासुदीच्या दिवसात महिन्यांची २० तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिले नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, फेब्रुवारीतही शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे वेळेत पैसे न मागितल्यामुळे पगार उशिरा झाले होते. आमदार कपिल पाटील यांनी वित्त सचिवांना भेटून हा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा पगार झाला. पण, एप्रिल संपत आला तरीही मार्चचा पगार झाला नाही. अनेक शिक्षक कोविडग्रस्त असून उपचारासाठी खर्च होत आहे. कर्जाचे हप्ते थकले असून दंड, व्याज भरावे लागत आहे.