शिराळा तालुक्यातील शिक्षकांनी केला लॉकडाऊनचा सदुपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:47+5:302021-02-25T04:32:47+5:30

गंगाराम पाटील लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : शिराळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी लाॅकडाऊनचा सदुपयोग करून आपल्या शाळेचा ...

Teachers in Shirala taluka made good use of the lockdown | शिराळा तालुक्यातील शिक्षकांनी केला लॉकडाऊनचा सदुपयोग

शिराळा तालुक्यातील शिक्षकांनी केला लॉकडाऊनचा सदुपयोग

Next

गंगाराम पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : शिराळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी लाॅकडाऊनचा सदुपयोग करून आपल्या शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे शाळांचे रुपडे पालटले आहे. संपूर्ण गावाने एखादी गोष्ट करायची ठरविली तर कोणत्याही अडचणींवर मात करीत ती साध्य करता येते, हे यातून सिद्ध झाले आहे.

शिराळा तालुक्यातील जवळपास २० गावे व तेथील शाळेतील शिक्षकांनी हा उपक्रम राबविला आहे. शिराळा डोंगरी तालुका असतानाही शिक्षणाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर व विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, प्रभारी विस्तार अधिकारी आलिशा मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक व माध्यमिक शाळा गुणवत्ता विकासासाठी निकराचे प्रयत्न करीत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या जवळपास २० शाळांनी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या शाळा अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे.

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती समोर आली. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसह सर्वजण तंत्रस्नेही बनले. सोशल मीडियातील वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून त्यांनी अध्यापनाचे काम चालूच ठेवले. इतक्यावरच न थांबता सुट्टीचा सदुपयोग करीत आपल्या शाळांमध्ये जाऊन ती अद्ययावत करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न काैतुकास्पद आहे.

चाैकट

या शाळांमध्ये झाल्या सुधारणा

आरळा येथील सिद्धार्थनगर, रिळे, मांगरूळ, शांतीनगर, बिऊर, अस्वलेवाडी, कणदूर, चिखली, पाचुंब्री, बेलेवाडी, शिराळे खुर्द, पाडळी, मांगले नं. १ व २, सागाव नं १ व २, ढोलेवाडी, नाटोली येथील शाळांचे रुपडे पालटले आहे.

फोटो -

आरळा सिद्धार्थनगर तसेच चिखलीसह तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी आकर्षक रूपात दिसत आहेत.

Web Title: Teachers in Shirala taluka made good use of the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.