शिक्षक बदल्या लांबल्या सांगली ‘वेटिंग’वर : अन्य जिल्ह्यांच्या याद्या मात्र प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:35 AM2018-05-16T00:35:22+5:302018-05-16T00:35:22+5:30

राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत सुगम-दुर्गम बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, बदली प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे

Teacher's transit, Sangli 'Waiting': Other district lists are famous only | शिक्षक बदल्या लांबल्या सांगली ‘वेटिंग’वर : अन्य जिल्ह्यांच्या याद्या मात्र प्रसिद्ध

शिक्षक बदल्या लांबल्या सांगली ‘वेटिंग’वर : अन्य जिल्ह्यांच्या याद्या मात्र प्रसिद्ध

Next

सांगली : राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत सुगम-दुर्गम बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, बदली प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्याची यादी मंगळवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता होती, मात्र रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे शासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या शिक्षक बदल्यांच्या यादीकडे लक्ष लागले आहे.

राज्यात सुगम-दुर्गम भागातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्या यावरून गेले वर्षभर चांगलेच वातावरण तापले होते. बदली प्रक्रियेत सुधारणा व्हावी यासाठी संघटनांनी मोर्चे काढले. परंतु यंदा प्रशासनाने कोणताही दबाव न घेता अखेर बदली प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत अशा दोन्ही टप्प्यांवर या बदल्या होताना दिसत आहेत. उन्हाळी सुटीत बदल्या होणार असल्याचे अटळ आहे. बदली प्रक्रिया ही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याचदिवशी या आदेशाद्वारे शिक्षकांना कार्यमुक्त करावे लागणार आहे. बदली झालेल्या शिक्षकांना दुसºयादिवशी लगेच बदली झालेल्या शाळेत तात्काळ रुजू व्हावे लागणार आहे.

जिल्ह्यांतर्गत बदल्यांची यादी शासनाच्या पोर्टलवरुन प्रसिद्ध केली जात आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्याची यादी मंगळवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता होती. मात्र रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे यादीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आंतरजिल्हा बदल्यांची यादी गत आठवड्यात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातून बाहेर जाणाºया शिक्षकांची संख्या २०८ आहे. इतर जिल्ह्यातून येणाºया शिक्षकांची संख्या अवघी ६० आहे. जिल्ह्यातून बाहेर जाणाºया शिक्षकांची संख्या मोठी असल्याने त्या शिक्षकांना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाकडे मागविला अभिप्राय
जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या दि. १५ मेपर्यंतच कराव्यात, असा शासनाचा आदेश आहे. पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बदल्या करता आल्या नाहीत. आचारसंहिता दोन दिवसात संपणार असून, दि. १५ मेनंतर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या प्रशासकीय बदल्या केल्या तर चालतील का, याबद्दल शासनाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने अभिप्राय मागितला आहे.

Web Title: Teacher's transit, Sangli 'Waiting': Other district lists are famous only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.