महाडिक अभियांत्रिकीत शिक्षकांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:19+5:302020-12-08T04:23:19+5:30
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बारावी सायन्सच्या सुधारित ...
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बारावी सायन्सच्या सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी राज्यातून ६४ शिक्षक सहभागी झाले होते. बारावी सायन्सचा अभ्यासक्रम सुधारित पॅटर्नप्रमाणे यावर्षी अंमलात येत असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेसाठी प्रा. आर. एस. शिंदे, प्रा. एम. सी. गायकवाड व प्रा. एस. जी. वळगडे यांनी मार्गदर्शन केले. सुधारित अभ्यासक्रमप्रणाली, सीईटी परीक्षेचे स्वरूप व विद्यार्थ्यांची मानसिकता यामध्ये शिक्षकांची असणारी भूमिका अशा विषयांचा कार्यशाळेमध्ये समावेश होता.
संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपप्राचार्य प्रा. नीलेश साने, समन्वयक प्रा. डॉ. शेखर माळी, प्रा. अक्षय चव्हाण यांनी संयोजन केले. विभागप्रमुख प्रा. दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले. प्रा. प्रियांका जानकर, प्रा. तेजल कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो -०७१२२०२०-आयएसएलएम-पेठ न्यूज पेठ (ता. वाळवा) येथील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकीमध्ये झालेल्या कार्यशाळेत प्रा. महेश जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आर. एस. शिंदे, एस. जी. वळगडे, एम. सी.गायकवाड, प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे उपस्थित होते.