जतमध्ये रुग्णालयात ताेडफाेड; गुंडासह तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:28+5:302021-03-28T04:25:28+5:30

जत : जत शहरातील विजापूर ते गुहागर राज्य मार्गालगत असलेल्या डॉ. झारी यांच्या हिराई हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत रुग्णालयात ...

Tedfed at the hospital in Jat; Charges filed against three including goons | जतमध्ये रुग्णालयात ताेडफाेड; गुंडासह तिघांवर गुन्हा दाखल

जतमध्ये रुग्णालयात ताेडफाेड; गुंडासह तिघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

जत : जत शहरातील विजापूर ते गुहागर राज्य मार्गालगत असलेल्या डॉ. झारी यांच्या हिराई हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत रुग्णालयात ताेडफाेड करण्याचा प्रकार घडला. रुग्णालयातील कर्मचारी संतोष भीमाण्णा बिराजदार (वय २२, रा. खोजानवाडी, ता. जत) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रोहित सोनुरे (वय ३०, रा. अचकनहळ्ळी, ता. जत), रमेश चोरमुले (२५, रा. जत) व अन्य एका अनाेळखीविराेधात जत पोलिसात संतोष बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत शहरातील सोलनकर चौकालगत डॉ. झारी यांचे हिराई हॉस्पिटल आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्यादरम्यान राेहित साेनुरे, रमेश चाेरमुले व अन्य एक अनाेळखी असे तिघेही दुचाकीवरून या हॉस्पिटलमध्ये आले. चौकशी काउंटरवर जाऊन संतोष बिराजदार यांना ‘डॉक्टर कुठे गेले आहेत? आता ताबडतोब मला सांग, अन्यथा बघून घेऊ’ अशी धमकी दिली. टेबलवर हात आपटून काचा फोडून, संगणक खाली पाडला. मोडतोड करून सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण पाटील करत आहेत.

Web Title: Tedfed at the hospital in Jat; Charges filed against three including goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.