कडेपूरच्या विलगीकरण कक्षाची तहसीलदारांकडून पाहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:09+5:302021-06-04T04:21:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेपूर : कडेपूर (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोविड विलगीकरण कक्षास तहसीलदार डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेपूर : कडेपूर (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोविड विलगीकरण कक्षास तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी भेट देऊन येथे मिळत असलेले उपचार आणि सोयी-सुविधा याबाबत रुग्णांशी संवाद साधला. सर्व रुग्णांची दररोज तपासणी करण्याच्या सूचना तहसीलदारांनी आरोग्य विभागास दिल्या.
यावेळी सरपंच सौ. रुपाली यादव, ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब यादव, माजी सरपंच पंजाबराव यादव, ग्रामविकास अधिकारी अनिल जमदाडे, तलाठी बी. एम. पाटील प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. रुग्णांना सकाळी चहा, नाष्टा, जेवण, दुपारी चहा, रात्री जेवण, अंडी, चिकन असे जेवण मोफत दिले जात आहे.
या संस्थात्मक विलगीकरण कक्षास पाटील यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. सर्व रुग्णांची दररोज तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना केल्या. ग्रामपंचायतीने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून जो निर्णय घेतला आहे, तो स्तुत्य असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच संग्राम यादव, अमर यादव, अविनाश यादव, भरत यादव, विजय वाघमारे उपस्थित होते.