सांगा, अडीच हजार नागरिकांना मार्ग कोणता?
By admin | Published: August 6, 2016 11:58 PM2016-08-06T23:58:10+5:302016-08-06T23:58:10+5:30
सावरखेडला जाणाऱ्या पेढी नदीवरील पूल वजा बंधाऱ्याचा मार्ग लघु पाटबंधारे विभागाच्या निष्कर्षाअंती जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याचे निर्देश दिलेत.
शिराळा : जिवंत नागांची पूजा करणाऱ्या शिराळकरांना नाग पकडण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे नागपूजा करायला वारूळ शोधायची वेळ आली आहे. नागपंचमीला स्वागत फलक, कमानींनी झगमगणाऱ्या शिराळा शहरात यावर्षी मात्र काळ्या झेंडे लागणार आहेत. जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या शिराळकरांकडून आज (रविवारी) नागपंचमीचे काळ्या झेंड्यांनी स्वागत होत आहे.हजारो वर्षांपूर्वी गोरक्षनाथांनी शिराळा येथे महाजनांच्या घरी जिवंत नागाच्या पूजेला सुरुवात केली. ही परंपरा आणि त्याचे पावित्र्य राखत हा सण साजरा केला जात होता. मात्र २००२ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आणि शिराळकरांच्या नागपंचमीला उतरती कळा लागली. २०१४ पर्यंत घराघरात आणि अंबामाता मंदिरात जिवंत नागाची पूजा केली गेली, मात्र २०१५ ला अंतिम आदेशाने नाग पकडण्यासही बंदी घातल्याने जिवंत नागपूजा थांबवण्यात आली.
उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतरही शिराळकरांनी नागपूजेला परवानगी मिळेल, या अपेक्षेने अनेक बंधने घालून घेतली. छायाचित्रण व्यवसाय पूर्ण बंद करण्यात आला. बिनविषारी सर्प पकडणे बंद झाले. मात्र शिराळकरांचा भ्रमनिरास झाला. न्यायालयाने अंतिम आदेशाद्वारे नाग पकडण्यासही बंदी घातली.
हजारो वर्षांची परंपरा बंद पडली. पूर्ण नागपूजेस बंदी असल्याने शिराळकरांनी आता निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जात, धर्म, पक्ष, गट यास बाजूला सारून सर्व शिराळकर एकवटले आहेत. शिवाय यावर्षी नागपंचमी दिवशी सर्व गावकरी घरावर काळे झेंडे लावणार आहेत. त्याचबरोबर स्वागत कमानी, फलक न लावता सर्व गावात काळे झेंडे आणि काळ्या गुढ्या उभारण्यात येणार आहेत. स्वागत कमानी आणि फलकांऐवजी काळे झेंडे आणि प्रत्येक ठिकाणी बहिष्काराचे फलक लावले गेले आहेत. ‘ये लढाई आर पार है, अंतिम यह प्रहार है’असे फलक संपूर्ण शहरात झळकत आहेत. (वार्ताहर)
स्वागत कमानींऐवजी काळ्या गुढ्या
नागपंचमीसाठी शिराळा शहर सज्ज झाले आहे. मात्र स्वागत कमानींऐवजी काळे झेंडे, काळ्या गुढ्या, निवडणुकीवर बहिष्कार, तसेच शासनाच्या निषेधाच्या फलकांचीच गर्दी दिसत आहे.
प्रशासनाला सहकार्य करीत न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नागपंचमी साजरी करण्याचा निर्णय घेतला असला तरी शिराळकरांची नाराजी स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी शहरातून संचलन केले, तसेच वनविभागाच्या वतीने प्रबोधन रॅली काढण्यात आली.