Sangli: मंदिरावर वीज पडल्याने शिखर कोसळले, अनेक घरांनाही तडे गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 01:18 PM2023-11-10T13:18:59+5:302023-11-10T13:19:19+5:30

विटा : आळसंद (ता. खानापूर) येथील कमळापूर रस्त्यालगत असणाऱ्या सुरपाबाईच्या मंदिरावर वीज पडल्याने शिखराचा भाग कोसळला. या विजेच्या दणक्याने ...

Temple collapsed due to lightning in Sangli | Sangli: मंदिरावर वीज पडल्याने शिखर कोसळले, अनेक घरांनाही तडे गेले

Sangli: मंदिरावर वीज पडल्याने शिखर कोसळले, अनेक घरांनाही तडे गेले

विटा : आळसंद (ता. खानापूर) येथील कमळापूर रस्त्यालगत असणाऱ्या सुरपाबाईच्या मंदिरावर वीज पडल्याने शिखराचा भाग कोसळला. या विजेच्या दणक्याने शेजारी असणाऱ्या अनेक घरांनाही तडे गेले. ही घटना बुधवारी (दि.८) घडली.

विटा शहरासह खानापूर तालुक्यात बुधवारी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. आळसंद येथे विजेचा प्रचंड कडकडाट झाला. येथील कमळापूर रस्त्यालगत असलेल्या सुरपाबाई देवीच्या मंदिराच्या शिखरावर वीज पडली. त्यावेळी मंदिराच्या शिखराचा काही भाग कोसळला.

अचानक झालेल्या विजेच्या आवाजाने अनेकजण भयभीत झाले. मोठा आवाज झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. मंदिरावर वीज पडल्याने त्याचे शिखर ढासळले. शेजारी असणाऱ्या घरांनाही तडे गेले. अनेक व्यावसायिक तसेच रहिवाशांची विद्युत उपकरणेही जळाली आहेत.

घटनेनंतर सरपंच अजित जाधव, पोलिस पाटील गणेश शेटे, क्रांती कारखान्याचे संचालक संग्राम जाधव, सत्यवान शिरतोडे यांच्यासह ग्रामस्थांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Temple collapsed due to lightning in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली