माणिकनाळमध्ये फळबागांचे दहा लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:20+5:302021-04-28T04:28:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : माणिकनाळ (ता. जत) येथे वादळी वारे, वळीवाच्या पावसाने टोमॅटो, डाळिंब, चिंच, लिंबू, आंबा फळबागेचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : माणिकनाळ (ता. जत) येथे वादळी वारे, वळीवाच्या पावसाने टोमॅटो, डाळिंब, चिंच, लिंबू, आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे. विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. घराचे पत्रे उडून गेले आहेत. यामध्ये दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबतची माहिती अशी, पूर्व भागातील माणिकनाळ कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह वळीवाचा पाऊस झाला. वळीव पाऊस,वादळी वाऱ्यामुळे पंचवीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लिंबू, आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. जिनेसाब चाँदसाब मुल्ला यांची द्राक्षे बागेतील ओळ पडली आहे. शिवाप्पा मल्लेशाप्पा कारकल, शंकर मारुती मुंजे या शेतकऱ्यांचे देशी आंबे पडले आहेत.
बसगोंडा रामगोंडा बगली, अमिनसाब दर्गा यांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. गजानन अमसिध्द घेरडी या शेतकऱ्याचे टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. गावठाण हद्दीतील चार विद्युत खांब मोडून पडले आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आहे. नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यावेळी मंडल अधिकारी तळपे, तलाठी एम.व्ही बंडगर, कृषी सहाय्यक विजया राठोड, पंचायत समिती सदस्य ॲड. आडव्यापा घेरडे, शेतकरी उपस्थित होते.