आष्ट्यात काेराेनाचे दहा नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:05+5:302021-04-28T04:30:05+5:30
आष्टा : आष्टा शहरात मंगळवारी कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले. शहरात एकूण रुग्णांची संख्या १६४ झाली आहे, अशी ...
आष्टा : आष्टा शहरात मंगळवारी कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले. शहरात एकूण रुग्णांची संख्या १६४ झाली आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी यांनी दिली.
आष्टा शहरात १ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून ग्रामीण रुग्णालय, स्पंदन हॉस्पिटल अँड आयसीयू, क्रिटी केअर हॉस्पिटल व अण्णासाहेब डांगे धन्वंतरी रुग्णालय येथे कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच कृष्णामाई हॉस्पिटल येथेही लवकरच कोरोना रुग्णांसाठी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. सर्वच ठिकाणी हॉस्पिटल पूर्णक्षमतेने भरलेली आहेत. अतिरिक्त तहसीलदार दीक्षान्त देशपांडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, डॉ. सुमित कबाडे, डॉ. सुजय कबाडे, डॉ. मनोहर कबाडे यांच्यासह सर्वच डॉक्टर्स अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन दीक्षान्त देशपांडे यांनी केले आहे.